महाराष्ट्र शासन
शिक्षण संचालनालय
(माध्यमिक व उच्च माध्यमिक)
Skip Navigation Links
शिक्षण संचालनालय(माध्यमिक व उच्च माध्यमिक),पुणे महाराष्ट्र राज्यराष्ट्रीय शिक्षक कल्याण प्रतिष्ठान
योजनेचे नाव व प्रस्थावना राष्ट्रीय शिक्षक कल्याण प्रतिष्ठान
केंद्र शासनाने राष्ट्रीय शिक्षक कल्याण प्रतिष्ठानची स्थापना,चँरिटेबल इंडोमेंट अँक्ट,१९८० अनुसार १९६२ मध्ये केलेली आहे.
योजना/कार्यक्रमाचे स्वरूप/माहिती व व्याप्ती शिक्षक कल्याण निधी या योजनेसाठी दरवर्षी अर्थसंकल्पात कायमस्वरूपी १.१० लाख रुपयाचे सहाय्यक अनुदान मंजूर करण्यात येते व त्या अनुदानातून राज्य सरकारकडून केंद्र शासनाच्या या प्रतिष्ठानास दरवर्षी रु.२५,००० अंशदान देण्यात येत होते.आता त्यामध्ये वाढ होऊन ते रु.१.०० लाख प्रतिवर्ष असे करण्यात आले आहे.(शै.वर्ष २०११-१२ )देते.तसेच जमा संकलित निधीतून १० टक्के रक्कम केंद्र शासनास परस्पर बँकेमार्फत जमा केली जाते.त्यामधून केंद्र शासन राबवीत असलेल्या.
१)पुरस्कार प्राप्त शिक्षकांना १४ दिवसापर्यंत राजा प्रवास सवलत योजना
२)गंभीर आजारपणात आर्थिक सहाय्य
३)१५० शिक्षकांच्या पाल्यांना व्यावसायिक शिक्षणासाठी रु.१५,००० पर्यंत आर्थिक मदत
४)शिक्षक भवन या इमारतीत परगावहून येणार्‍या शिक्षकांची अल्प दारात राहण्याची सोय.
५)शिक्षक कल्याण निधीमार्फत पाठविण्यात येणार्‍या प्राप्त अर्जदारांना आर्थिक मदत देण्यात येते.
योजनेचा उद्देश शिक्षकांना व त्यांच्या कुटुंबियांना आपत्कालीन परिस्थितीत (उदा.अवलंबित व स्वतःचे आजारपण,वंध्यत्व व इतर आजार) यासाठी आर्थिक साहाय्य देणे हा आहे.या कारणासाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्यासाठी दरवर्षी ५ सप्टेंबर या शिक्षक दिनाचे निमित्ताने निधी संकलित केला जातो.
अंमलबजावणी यंत्रणा निधी संकलित करणेसाठी दरवर्षी अर्थसंकल्पात मंजूर केलेल्या अनुदानातून ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त,शिक्षणाधिकारी(प्राथमिक),जिल्हा परिषद कार्यालये,प्रशासन अधिकारी,महानगरपालिका,शिक्षण मंडळ यांना बिल्ले छापून त्यांचे विक्रीपासून जमा झालेल्या निधी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेत नँशनल फौंडेशन फॉर टिचर्स वेलफेअर या खात्यात जमा केला जातो.तसेच सर्व प्रशासकीय कामकाज हे राज्यस्तरीय समितीमार्फत केले जाते.
योजना
Skip Navigation Links.
माहिती अधिकार
Skip Navigation Links.
शासन निर्णय
Skip Navigation Links.
कार्यालय सूची व दूरध्वनी क्रमांक
Skip Navigation Links.
महत्वाच्या वेबसाईट
Skip Navigation Links.
Best View in Internet Explorer 6 and later. Screen Resolution : 1024 X 786
Copyright © All rights reserved.
Powered by Prabodh Sanganak Seva Kendra