राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक
विद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी व शालेय शिक्षण
विभागाने जबाबदारी सोपविलेल्या इतर बाबीसंबंधीच्या शिष्यवृत्ती योजनांची
कार्यवाही राज्यस्तरीय संस्था म्हणून या संचालनालयामार्फत केली जाते.
योजनानिहाय शासनाने निश्चित केलेल्या निकषानुसार पात्र
विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.त्यासाठी राज्य स्तरीय संस्था
म्हणून हे संचालनालय काम पाहते.
विविध शिष्यवृत्ती योजनेसाठीचे निकष पूर्ण करणार्या
विद्यार्थी-विद्यार्थीनीना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी
निकषाप्रमाणे अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध करून घेणे,
आवश्यकतेनुसार या तरतुदीचे जिल्हास्तरावर वितरण करणे,प्रत्यक्ष
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न
करणे,या सर्व बाबींची कार्यवाही या संचालनालयाच्या स्तरावरून केली जाते.
विविध शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी ही विभागीय शिक्षण
उपसंचालक,शिक्षणाधिकारी(माध्यमिक),गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत केली
जाते.