शिक्षणसंचालक(माध्यमिक व
उच्चमाध्यमिक) या पदास महाराष्ट्र नागरी सेवा(सेवेच्या सर्वसाधारण
शर्ती)नियम १९८१ च्या नियम ९(२२) नुसार विभाग प्रमुखाचा दर्जा प्रदान
करण्यात आलेला आहे.हे पद महाराष्ट्र नागरी सेवा नियमांच्या अनुरोधाने विभाग
प्रमुखांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करण्यासाठी सक्षम आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम १९७९ च्या अनुरोधाने
विभाग प्रमुख म्हणून अधिनस्त शिक्षणाधिकारी दर्जापर्यंतच्या गट अ व गट ब
संवर्गातील अधिकार्यांविरुद्ध उक्त नियमाच्या भाग ३(५) नुसार किरकोळ
शिक्षेची कार्यवाही करण्याचे अधिकार आहेत.
तसेच या नियमानुसार अधिनस्त कार्यरत गट क व गट ड संवर्गातील
कर्मचार्यांविरुध्द किरकोळ व जबर शिक्षा करण्याच्या शक्ती प्रदान करण्यात
आल्या आहेत.
१.शिक्षण संचालक(माध्यमिक व उच्चमाध्यमिक) व विभाग प्रमुख म्हणून
विहित कर्तव्ये व जबाबदार्या पार पडणे
२.शिक्षण संचालक(माध्यमिक व उच्चमाध्यमिक) म्हणून सर्व संलग्न
संवालनालयांच्या कार्यपद्धतीबाबत समन्वयात्मक
भूमिका पार पाडणे व शासनास प्रशासकीय व शैक्षणिक दृष्टीकोनातून सल्ला देणे.
३.गट अ व गट ब या संवर्गातील अधिकार्यांचे आस्थापना विषयक कामकाज पाहणे.
४.गट ब,क व गट ड या संवर्गातील अधिकारी व कर्माचार्यांच्या
नियुक्त्या,पदोन्नत्या,बदल्या तसेच चौकशीच्या
संदर्भातील कामकाज पाहणे.
५.गट अ संवर्गातील अधिकार्यांचे गोपनीय अभिलेख प्राप्त करून घेऊन
शासनास सादर करणे व गट ब व क संवर्गातील अधिकारी व
कर्मचार्यांचे गोपनीय अहवाल प्राप्त करून घेऊन ते जतन करणे.
६.गट अ,ब,क,ड संवर्गातील सर्व अधिकारी व कर्मचार्यांचे सेवाविषयक
बाबींची कागदपत्रे अद्ययावत ठेवणे, आवश्यकतेनुरूप
शासनास पुरविणे.गट ब,क व ड या संवर्गातील पदोन्नती निवड समितीच्या बैठका
घेणे.
७.गट अ व ब संवर्गातील अधिकार्यांना व गट क व ड संवर्गातील कर्मचार्यांना विशेष वेतन मंजूर करणे.
८.गट अ ते ड संवर्गातील अधिकारी/कर्मचारी यांच्या सेवा जेष्ठता
याद्या तयार करून शासन मान्यतेने प्रसृत करणे.
९.गट अ ते ड या संवर्गातील अधिकारी/कर्मचार्यांस मराठी व हिंदी भाषा परीक्षेतून सुट देणे.
१०.गट अ व ब संवर्गातील अधिकार्यांच्या वार्षिक वेतनवाढी मंजूर करणे.
११.गट अ व ब संवर्गातील अधिकार्यांची विभागीय चौकशी प्रकरणे हाताळणे.
१२.गट अ ते ड या संवर्गातील अधिकार्यांची/कर्मचार्यांची वैद्यकीय बिले मंजूर करणे.
१३.गट अ ते ब या संवर्गातील अधिकार्यांच्या रजा मंजूर करणे.
१४.गट अ ते ड या संवर्गातील अधिकारी/कर्मचार्यांना परदेश गमनासाठी ना हरकत प्रमाणपत्र देणे.
या कार्यालयाच्या अधिनस्थ राज्यस्तरा
पासून जिल्हा स्तरापर्यंत येणार्या सर्व कार्यालयातील दिनांक
२९ फेब्रुवारी २०१२ रोजी
कार्यरत असलेल्या अधिकार्यांची यादी व दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे.
|
| योजना |
 |  |
| माहिती अधिकार |
 |  |
| शासन निर्णय |
 |  |
| कार्यालय सूची व दूरध्वनी क्रमांक |
 |  |
| महत्वाच्या वेबसाईट |
|
|